भारत-चीन संघर्ष; जिनपिंग यांनी कुरापतींसाठी तवांगमध्ये नियुक्त केलेला चिनी जनरल कोण आहे?

153

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याचा घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा हा प्रयत्न आपल्या ईस्टर्न कमांडचे नेतृत्व करणाऱ्या जनरलच्या इशाऱ्यावर केला होता. चिनी सैनिकांचा हा जनरल नेमका कोण आहे? जाणून घेऊया…

( हेही वाचा : नववर्षात रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळणार खास सुविधा! या स्थानकांवर सुरू होणार ‘ममता कक्ष’)

ईस्टर्न थिएटरचे कमांडर आहेत तरी कोण?

चीनच्या ईस्टर्न कमांडच्या कमांडरचे नाव लिन शियांगयांग आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्यावर्षी निवडक ५ अधिकाऱ्यांना बढती दिली होती. यामध्ये कमांडर वांग हॅजियांग, पीएलएच्या नेव्ही डोंग जूनचे कमांडर, पीएलएच्या हवाई दलाचे कमांडर चांग डिंगक्यू व पीएलएच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे अध्यक्ष जू शुकियांग यांचा समावेश होता. तेव्हाच लिन शियांगयांग यांनाही बढती देण्यात आली. ते बढती देण्यापूर्वी ते सेंट्रल थिएटर कमांड सांभाळत होते. त्यानंतर त्यांची ईस्टर्न कमांडच्या कमांडरपदी नियुक्ती करण्यात आली होती.

ईस्टर्न थिएटर कमांडमध्ये पूर्व चीन, पूर्व चिनी समुद्र व तैवानचा भाग येतो. चीनचा ईस्टर्न थिएटरच्या यांगत्से भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या भागात भारत अत्यंत मजबूत स्थितीत आहे. हा भाग तब्बल १७ हजार फूट उंचीवर आहे. चीनने या भागात नियुक्त केलेल्या लिन शियांगयांग यांचा जन्म १९६४ रोजी फुजियानच्या हायको शहरात झाला. २०१६ मध्ये त्यांची ४७ व्या ग्रुप ऑफ आर्मीच्या कमांडरपदी नियुक्ती करण्यात आली. कालांतराने त्यांनी ८२ व्या आणि ७२ व्या ग्रुप ऑफ आर्मीचे कमांडर बनवण्यात आले. सेंट्रल कमांडची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळल्यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ईस्टर्न कमांडच्या कमांडरपदी केली.

New Project 9 4

तवांगमधील हिंसक चकमकीनंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकरसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.