आयएसआयच्या महिला एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला भारतीय जवान

153

भारतीय लष्करातील जवानांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय ही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कायम प्रयत्न करत असते. त्यानुसार पुन्हा एकदा भारतीय लष्करातील जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला. जवान प्रदीप कुमार याला शनिवारी, २१ मे रोजी पाकिस्तानला लष्करी माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. राजस्थान पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. एका पाकिस्तानी महिलेने आपल्या हनीट्रॅपमध्ये या जवानाला अडकवले होते. जोधपूरमध्ये तैनात असलेला प्रदीप कुमार फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला होता. प्रदीपच्या संपर्कात राहण्यासाठी तिने हिंदू महिला असल्याचे भासवल्याचा आरोप आहे. या महिलेने स्वत:ची ओळख छदम असून ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असल्याची बतावणी केली.

गोपनीय कागदपत्रे मागितली

पाकिस्तानी एजंटने कुमारला विश्वासात घेतले आणि ती बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट फर्मसाठी काम करते असे सांगितले. अनेक महिन्यांनंतर कुमार लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आला आणि भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे मागितली. लष्करा संबंधित गोपनीय माहितीचे फोटो पाकिस्तानी महिलेला पाठवण्यात आले होते, जी महिला कथितरित्या आयएसआयसाठी काम करते.पोलिसांनी सांगितले की, कुमार आणि पाकिस्तानी महिला सहा महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. इंटेलिजन्सचे डीजी उमेश मिश्रा यांच्या मते, कुमारने व्हॉट्सअॅपद्वारे पाक एजंटसोबत धोरणात्मक योजनेबाबतच्या कागदपत्रांच्या फोटोंची देवाणघेवाण केली आणि इतर सैनिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला गेला. कुमारच्या आणखी एका महिला मैत्रिणीचाही या गुन्ह्यात सहभाग होता.हेरगिरीच्या संशयावरून राजस्थान पोलिसांनी १८ मे रोजी कुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि शनिवारी, २१ मे रोजी अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा शरद पवार ब्राह्मणविरोधी! पवारांचे ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण, पण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.