हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले ‘एलसीए तेजस’ हे २ आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले. (LCA Tejas) बंगळुरू-मुख्यालय असलेल्या कंपनीने सांगितले की, ट्विन-सीटर व्हेरिएंटमध्ये IAF च्या प्रशिक्षण आवश्यकता पूर्ण करण्याच्या सर्व क्षमता आहेत आणि आवश्यकतेच्या बाबतीत लढाऊ म्हणूनही हे विमान कार्य करू शकते. (LCA Tejas)
(हेही वाचा – Nanded Hospital Tragedy : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल)
‘एलसीए तेजस’ हवाई दलाकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या समारंभात हे प्रमुख पाहुणे होते. हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी. बी. आनंदकृष्णन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. LCA ट्विन-सीटरचे अनावरण, रिलीझ टू सर्व्हिस (RSD) चे हस्तांतर, सिग्नलिंग आउट सर्टिफिकेट (SOC) आदी कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आले होते. (LCA Tejas)
या दोन आसनी विमानात हवाई दलाच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्याची सर्व क्षमता आहे. आवश्यकतेनुसार ते लढाऊ विमानाची भूमिकाही बजावू शकते. ‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एलसीए) तेजस हे विमान वजनाने हलके आहे. बहुउपयुक्त असलेले हे विमान ४.५ श्रेणीतील असून कोणत्याही हवामानात ते प्रभावी ठरू शकते. अद्ययावत संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण म्हणजे हे विमान असल्याचे हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सांगण्यात आले. या विमानामुळे भारत उच्च क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला असून भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला बळ मिळाले आहे, असे या बंगळुरूस्थित कंपनीकडून सांगण्यात आले. (LCA Tejas)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community