भारतीय वायुदलाची ताकद वाढली; संपूर्ण स्वदेशी 10 लाईट काॅम्बॅट हेलिकाॅप्टर वायुदलात दाखल

134

भारतीय वायू दलात नवीन स्वदेशी मेड इन इंडिया लाईट काॅम्बॅट हेलिकाॅप्टर दाखल झाले आहे. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. एलसीएच हेलिकाॅप्टर वायूदलाच्या ताफ्यात सामील झाले आहे. जोधपूर एयरबेसवर पार पडलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ एअर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. ( light combat helicopter)

लाईट काॅम्बॅक्ट हेलिकाॅप्टरची वैशिष्ट्ये

  • LCH हिंदुस्तान एरोनाॅटिक्स लिमिटेड कंपनीने तयार केलेले हेलिकाॅप्टर आहे.
  • यामध्ये 5.8 टन दुहेरी इंजिन आहे. या इंजिनमध्ये Safran या फ्रेंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
  • यामध्ये 20 मिमी बंदुक, 70 मिमी राॅकेट प्रणाली आणि हवेतून क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुसज्ज यंत्रणा आहे.
  • कमी वजनामुळे हे हेलिकाॅप्टर इतर अटॅक हेलिकाॅप्टरपेक्षा जलद आहे.
  • उंच भागात उड्डाण आणि लॅंडिंग करण्याची क्षमता
  • सर्व प्रकारच्या हवामानात लढण्याची क्षमता
  • आधुनिक संरक्षण प्रणाली, अंधारात हल्ला करण्याची क्षमता

( हेही वाचा: “बाबरी मशीद नहीं भुलेंगे”, PFI च्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड )

3 ऑक्टोबरला LCH हेलिकाॅप्टर जोधपूर सीमेजवळ तैनात असेल. LCH हेलिकाॅप्टर भारतीय सैन्यात आणि हवाई दलासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान या भारताला हल्ला करण्यासाठीच्या म्हणजे अटॅक हेलिकाॅप्टरची गरज भासू लागली होती. त्यानंतर LCH हेलिकाॅप्टर तयार करण्याची योजना आखण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.