Indian Air Force : हवाई दलाचे विमान हवेत असतानाच मोठा हल्ला ; म्यानमारला मदत नेत असताना…

145
Indian Air Force : हवाई दलाचे विमान हवेत असतानाच मोठा हल्ला ; म्यानमारला मदत नेत असताना...
Indian Air Force : हवाई दलाचे विमान हवेत असतानाच मोठा हल्ला ; म्यानमारला मदत नेत असताना...

भारतीय हवाई दलासोबत (Indian Air Force) धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलाचे विमान जे म्यानमारला भूकंप पीडितांसाठी मदत घेऊन गेल होते, त्यावर सायबर हल्ला करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायल आपल्यावरील हल्ले चुकविण्यासाठी जीपीएस प्रणालीवर सायबर हल्ले करत असल्याचे वृत्त आले होते. तसाच हल्ला या विमानावर हवेत असताना करण्यात आला आहे. (Indian Air Force)

हेही वाचा-Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, “बॉम्बने उडवू …”

भारतीय हवाई दलाचं विमान सी-१३० मदत सामग्री घेऊन म्यानमारला जात होतं. त्याचवेळी या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला झाला. हल्लेखोरांनी या विमानाची नेव्हिगेशन प्रणाली हॅक करण्याचा (स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा) प्रयत्न केला. हल्ल्याची जाणीव होताच त्या विमानाच्या वैमानिकाने ताबडतोब अंतर्गत नेव्हिगेशन प्रणालीवर स्विच केलं. वैमानिकाच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली. (Indian Air Force)

हेही वाचा- PM Narendra Modi यांनी प्रेरणा स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली !

संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितलं की भारतीय हवाई दलाच्या विमानाने म्यानमारच्या हद्दीत प्रवेश करताच पायलटला संशय आला की विमानातील नेव्हिगेशन प्रणाली चुकीचा मार्ग दाखवत आहे. या प्रणालीवर सायबर हल्ला झाला असावा असा वैमानिकाला संशय आला. यालाच जीपीएस स्पूफिंग म्हणतात. विमानाची दिशा बदलतेय हे देखील त्याच्या लक्षात आलं. अशावेळी बॅकअप नेव्हिगेशन प्रणालीचा वापर केला जातो. वैमानिकाने ताबडतोब विमान या प्रणालीवर स्विच केलं. (Indian Air Force)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.