अखेर ‘राफेल’ अंबाला एअरबेसवर उतरले

319

अखेर राफेल विमानांचे भारताच्या अंबाला एअरबेसवर लँडिंग झाले आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या जेटच्या ताफ्याने मंगळवारी रात्री संयुक्त अरब आमिरात (UAE) मध्ये मुक्काम केला. दरम्यान या विमानांनी बुधवारी दुपारी भारताकडे पुन्हा उड्डाण केले. राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, नौदलाने राफेलच्या वैमानिकांना  ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.

दरम्यान भारत सरकारने हवाई दलासाठी ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

राफेलचे वैशिष्ट्य – 

राफेल हे लढाऊ विमान असून, ते प्रत्येक मोहिमेवर पाठवलं जाऊ शकतं. तसेच भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
हे विमान एका मिनिटात ६० हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता १७ हजार किलो आहे. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.
यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
राफेलची मारक क्षमता ३७०० किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज ३०० किलोमीटर आहे.
हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
राफेल विमान २४,५०० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि ६० तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.
राफेल विमानाचा वेग २,२२३ किलोमीटर प्रति तास आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.