कोब्रा वॉरियर युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी

130

युनायटेड किंग्डम येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी रविवारी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली. 6 ते 24 मार्च दरम्यान हा कोब्रा वॉरियर युद्धसराव होणार आहे.

( हेही वाचा : भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! )

कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.

भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 या हवेत इंधन भरणाऱ्या विमानासह सहभागी होणार आहे. हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे आणि विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.