भारतीय हवाई दलाने इम्फाळ विमानतळाजवळ अज्ञात उडणारी वस्तू (UFO) (Unidentified flying object) शोधण्यासाठी राफेल हे लढाऊ विमान तात्काळ पाठवले. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी इम्फाळ विमानतळाजवळ अनोळखी उडती वस्तू दिसल्याची माहिती मिळाली होती.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, प्रगत सेन्सरने सुसज्ज असलेल्या फायटर जेटने यूएफओचा शोध घेण्यासाठी त्या हवाई क्षेत्रातील खालच्या पातळीवरून उड्डाण केले, मात्र तेथे भारतीय हवाई दलाला काही सापडले नाही. याबाबत भारतीय हवाई दलाने दिलेली माहिती अशी की, पहिले विमान परत आल्यानंतर दुसरे राफेल लढाऊ विमान पुन्हा त्या अज्ञात वस्तूच्या शोधासाठी पाठवण्यात आले. त्या विमानालाही UFOचा सुगावा लागला नाही.
Indian Air Force scrambled 2 Rafale fighter jets to search for ‘UFO’ sighted near Imphal
Read @ANI Story | https://t.co/ejDsAjqQGp#IndianAirForce #rafale #UFO pic.twitter.com/dm53tdHEQo
— ANI Digital (@ani_digital) November 20, 2023