भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी भारत आपली क्षेपणास्त्र क्षमता सुधारण्यात गुंतला आहे. यातच भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस एअर क्षेपणास्त्र लॉन्च केले. याच्या एक्सटेंडेड रेंजची यशस्वी चाचणी केली आहे. बंगालच्या उपसागरातील Su-30 MKI विमानातून लक्ष्यावर अचूक मारा करून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. सुखोई विमानाचे प्रक्षेपण ठरल्याप्रमाणे झाले आणि क्षेपणास्त्राने थेट बंगालच्या उपसागरातील लक्ष्यावर हल्ला केला.
The IAF successfully fired the Extended Range Version of the Brahmos Air Launched missile. Carrying out a precision strike against a Ship target from a Su-30 MKI aircraft in the Bay of Bengal region, the missile achieved the desired mission objectives. pic.twitter.com/fiLX48ilhv
— Indian Air Force (@IAF_MCC) December 29, 2022
सुखोई-30 एमकेआय विमानाच्या चांगला कामगिरीसह हवेतून प्रक्षेपित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची एक्सटेंडेड रेंज क्षमता भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवणार आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. भारतीय लष्कराच्या अंदमान-निकोबार द्वीपसमूह कमांडने ही चाचणी केली होती.
(हेही वाचा संधी असूनही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही; फडणवीसांचा टोला)
ब्रह्मोस क्षेपणास्त्राला हे नाव कसे मिळाले?
ब्रह्मोस भारताच्या संरक्षण संशोधन, विकास संस्था (DRDO) आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझ यांच्यातील संयुक्त करारांतर्गत विकसित केले गेले आहे. ब्रह्मोस हे मध्यम रेंजचे स्टेल्थ रामजेट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र युद्धनौका, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरून डागता येते. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरून या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community