आता महिलांचे लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. भारतीय लष्कराकडून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये लष्करात भरती होण्याची महिलांना देखील संधी मिळणार आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटवर 7 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करुन महिला सैन्यात भरती होऊ शकतात.
joinindianarmy.nic.in या वेबसाईटच्या माध्यमातून अग्निवीर भरती योजना सुरू करण्यात आली आहे. 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याद्वारे महिलांना मिलिट्री पोलिसमध्ये भरती होता येणार आहे.
(हेही वाचाः मोबाईल,ब्लूटूथ आणि लॅपटॉपच्या चार्जरबाबत मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, असा होणार फायदा)
काय आहे पात्रता आणि अटी
महिला अग्निवीर पदांसाठी अर्ज करणा-या इच्छुक उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक विषयांत उमेदवार किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. तसेच अर्जदाराचे वय हे 17 ते 23 या वयोगटातील असावे. याबाबतची अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे मिळणार आहे.
असा करा अर्ज
- joinindianarmy.nic.in ला विझिट करुन उमेदवाराने अग्निपथ सेक्शन निवडावा
- त्यानंतर Apply Online वर क्लिक करा
- आपला मेल आयडी समाविष्ट करुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी
- सर्व आवश्यक ते डिटेल्स भरुन आपला अर्ज अपलोड करुन सबमिट करावा
- या भरती मेळाव्यासाठी अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर 12 ते 13 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रवेशपत्रे पाठवली जाणार आहेत