भारतीय सैन्य दलाकडून अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अग्निवीर प्रक्रियेत आता शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
( हेही वाचा : पोलिसांची बनावट ओळखपत्रे बनवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न)
भरती प्रक्रियेत बदल
- सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. परंतु आता लेखी परीक्षा ही भरतीमधील पहिली पायरी असणार आहे. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लेखी परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे असे भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी सांगितले आहे.
- तसेच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागत आहे. या रकमेपैकी २५० रुपये भारतीय सैन्य दल देणार आहे तर उमेदवाराला फक्त २५० रुपये भरावे लागतील असेही कर्नल जी. सुरेश यांनी स्पष्ट केले.
अग्निवीर म्हणून भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी वर्षातून एकदाच ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा असे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ ही आहे यापूर्वी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
सुधारित भरती प्रक्रियेनुसार…
- ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE)
- शारीरिक चाचणी ( Physical test)
- वैद्यकीय चाचणी (Medical test )