अरुणाचल प्रदेशात लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले! वैमानिकांचा शोध सुरू

अरुणाचल प्रदेशातील मंडाला हिल्स परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. वैमानिकांच्या शोधासाठी सध्या या भागात शोधमोहिम सुरू असल्याची माहिती एनआयने ट्वीट करत दिली आहे.

चित्ता हेलिकॉप्टर सेंगे ते मिसमरीकडे उड्डाण करत होते. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि सहवैमानिक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गुरूवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास चित्ता या हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला अशी माहिती लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली आहे. हेलिकॉप्टर कोसळताच मदत आणि बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, यातील पायलट बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाच्या पश्चिमेस गुरूवारी सकाळी भारतीय लष्कराचे चित्ता हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशमध्येच लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here