देशाच्या उत्तर सीमेवर परिस्थिती संवेदनशील असून जम्मू-कश्मीरमधून घुसखोरीचे प्रयत्न थांबलेले नाहीत, ते सुरूच आहेत. त्यामुळे उत्तरेकडील सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व काही ठिक असल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिली.
२०२४ मध्ये लष्करात आधुनिकीकरण केले जाईल. आतापर्यंत आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करीत होतो, परंतु भविष्यात याहीपेक्षा अधिक टेक्नॉलॉजीचा वापर करू. सैन्यात आर्टिलरी युनिट्स आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टममध्ये सुधारणा केली जात आहे. देशाच्या सीमेवरील आव्हानात्मक ठिकाणी सैनिकांना वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करू, असे लष्करप्रमुख म्हणाले.
(हेही वाचा – Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ “भगवान दास” )
कुणीही आमच्यावर डोळे वटारू शकत नाही
भारतावर कुणीही डोळे वटारू शकत नाही. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीनचा हिंदुस्थानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ब्रिटन दौऱ्यात त्यांनी हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community