Indian Army: जवानांसाठी ‘स्कीन बँक’ सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले…

लष्करी दल वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रथमच अशा प्रकारची सेवा सुरू केली जात आहे.

82
Indian Army: जवानांसाठी 'स्कीन बँक' सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...
Indian Army: जवानांसाठी 'स्कीन बँक' सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले...

भारतीय लष्कराने (Indian Army) प्रथमच जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘स्कीन बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्घटनेत गंभीररीत्या भाजल्या गेलेल्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार करणे शक्य होईल. त्वचेशी संबंधित अन्य गंभीर आजारांवरदेखील या माध्यमातून उपचार करता येणार असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या स्कीन बँकेमध्ये उच्चशिक्षित वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जन, उती अभियंते आणि विशेष कौशल्यप्राप्त तंत्रज्ञांचा भरणा असेल असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. लष्करी रुग्णालय (संशोधन आणि संदर्भ) यांच्याकडून ही स्कीन बँक सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. लष्करी दल वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रथमच अशा प्रकारची सेवा सुरू केली जात आहे.

या बँकेमध्ये विविध प्रकारच्या त्वचेचे संकलन करण्याबरोबरच त्यावर प्रक्रियाही करण्यात येईल. पुढे ही त्वचा देशभरातील लष्कराच्या वैद्यकीय केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येईल. या स्कीन बँकेमुळे लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्याधुनिक त्वचा प्रत्यारोपण उपचारांचा लाभ घेता येईल. या वैद्यकीय सेवेदरम्यान उच्च दर्जाची सुरक्षा आणि गुणवत्ता यांचे पालन करण्यात येईल. येथील त्वचेची विश्वासार्हता कायम राहावी म्हणून आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करू, असेही लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Afg : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये भारताची रणनीती काय असेल? कुलदीपला संधी मिळेल का? )

गंभीर जखमींना फायदा
या स्कीन बँकेच्या माध्यमातून भारतीय जवानांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील तसेच गंभीररीत्या जखमी झालेल्यांनादेखील उपचाराच्या अनुषंगाने याचा मोठा लाभ होईल, अशी माहिती शस्त्र दले वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक कर्नल कमांडंट ले. जनरल अरिंदम चॅटर्जी यांनी दिली.

त्वचेच्या उतींचा मोठा स्रोत
त्वचेच्या उतींचा एक मोठा स्रोत आमच्याकडे उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावीरीत्या उपचार करता येऊ शकतील यामुळे गंभीर जखमी झालेल्या जवानांचे पुनर्वसन देखील होऊ शकेल, असे लष्करी रुग्णालयाचे (संशोधन आणि संदर्भ) ले. जनरल अजित नीलकंठन यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.