भारतीय लष्कर ध्वज दिन, जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन याप्रमाणेच भारतीयांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे भारतीय लष्कर ध्वज दिन.  सेनेचं प्रतिक असणा-या ध्वजाचा सन्मान करण्यासाठी 7 डिसेंबर 1949 पासून भारतात ध्वज दिन दरवर्षी भारतीय लष्कराकडून साजरा केला जातो.

म्हणून साजरा होतो लष्कर ध्वज दिन 

देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वज दिन साजरा केला जातो. या दिवशी ध्वज खरेदीतून जमा होणारी रक्कम शहीद जवानांच्या आश्रितांच्या कल्याणासाठी खर्च केली जाते.ध्वज या प्रतिकाचा सन्मान करणं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि भारतीय लष्कर म्हटलं की आपल्या समोर उभे राहतात ते भारतीय जवान आणि त्यांचे देशप्रेम. भारतीय जवानांची देशसेवा आणि जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करण्याची पराकाष्ठा. सेनेचे जवान आपल्या प्राणांची कुटुंबाची पर्वा न करता देशसेवा करतात. त्यांच्या या सेवेचे प्रतिक म्हणजे हा लष्कर ध्वज असतो.

 जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं 

तिरंगा ध्वज, लष्कर ध्वज अभिमानाने उंचावत असताना, देशभक्तीपर गाणी ऐकताना जवानांच्या बलिदानाची  गाथा ऐकताना अभिमानाने उर भरुन येतो. डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. लष्करी जवानांचा सन्मान करणं, आणि त्यांच्या त्यागाचाही सन्मान करणं आपली जबाबदारी आहे. भारतीय लष्कर ध्वज दिनानिमीत्ताने भारतीय जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यातून एकात्मतेचं बळं दृढ करणं महत्त्वाचं आहे.

 ( हेही वाचा   होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here