Indian Army: भारतीय लष्कराच्या विमानाचे तातडीने करावे लागले लँडिंग, कारण काय?

एरंडोली, मलेवाडी, परिसरातील नागरिकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

178
Indian Army: भारतीय लष्कराच्या विमानाचे तातडीने करावे लागले लँडिंग, कारण काय?

भारतीय युवासेनेचे एक हॅलिकॉप्टर वैद्यकीय साहित्य घेऊन शनिवारी, (४ मे) दुपारी नाशिकहून बेंगलोकडे निघाले होते. दरम्यान त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खंडेराजुरी येथून कमी उंचीने हेलिकॉप्टर जात होते. (Indian Army)

”भारतीय लष्कराच्या ए. एल. एच ध्रुव हेलिकॉप्टरला शनिवारी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका गावाजवळील शेतात सावधगिरीने लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरला हवेत खूप जास्त कंपने जाणवली. हेलिकॉप्टर आता नाशिक लष्करी स्थानकावर परत आले आहे – भारतीय लष्कराचे अधिकारी”, अशी एका वृत्तवाहिनीने व्हिडियोसह त्यांच्या अधिकृत ‘X’ हँडलद्वारे माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे ‘विशेष लक्ष’ देणार – देवेंद्र फडणवीस )

एरंडोलीजवळ त्या हेलिकॉप्टरने तीन घिरट्या घातल्या. त्यानंतर ओढ्याशेजारील जान्हवी मंदिराजवळ परशु हाक्के यांच्या शेतात खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. त्यामध्ये तीन आर्मीचे जवान होते. एरंडोली, मलेवाडी, परिसरातील नागरिकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हवेत हेलिकॉप्टरला कंपने जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने लॅंडिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.