भारतीय लष्कराच्या (Indian Army) सुपर 30 कार्यक्रमांतर्गत आसाममधील विविध जिल्ह्यांतील 30 तरुणांना अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका कठीण प्रक्रियेतून या तरुणांची निवड करण्यात आली आहे. तुमुलपूर येथे सोमवारपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. हे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) च्या निवड प्रक्रियेसाठी तयार केले जातील.
राज्यातील तरुणांना अधिकारी पदावर सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने लष्कराने हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील हा अशा प्रकारचा दुसरा कार्यक्रम आहे. याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये दिब्रुगडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.
(हेही वाचा – BMC : संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
लष्कराकडून NIEDOसोबत करार
लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या या कार्यक्रमाला राज्य सरकारचा पाठिंबा मिळाला आहे. नॅशनल इंटिग्रिटी अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (NIEDO) नावाची एनजीओ या कार्यक्रमात भारतीय सैन्याला मदत करत आहे. गेल्या आठवड्यातच लष्कराने NIEDO सोबत करार केला.
२ बॅचमध्ये ट्रेनिंग…
संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत म्हणाले की, सैन्याच्या खालच्या पदावर आसाममधील जवान मोठ्या संख्येने आहेत, परंतु अधिकारी स्तरावर आसाममधील तरुणांची संख्या फारच कमी आहे. हा उपक्रम लष्कराच्या पूर्व कमांडने सुरू केला आहे, जेणेकरून हुशार विद्यार्थ्यांना प्रेरित होऊन त्यांना अधिकारी म्हणून सैन्यात सामील होण्यास मदत होईल. तुमुलपूर येथील आर्मी स्टेशनवर होणारा हा निवासी कार्यक्रम असून त्यामध्ये यावर्षी विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरी तुकडी एप्रिलमध्ये येईल. जे विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यांना SSB निवडीच्या पुढील टप्प्याची तयारी करण्यास मदत केली जाईल.
केवळ गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड…
NIEDO चे सीईओ रोहित श्रीवास्तव यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीला नोव्हेंबरमध्ये डिब्रूगडमध्ये द्वितीय पर्वत विभागांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. तुमुलपूर येथे सुरू होणारा सुपर 30 कार्यक्रम 21 माउंटन डिव्हिजनच्या 107 ब्रिगेडअंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे नाव जरी सुपर 30 असे असले, तरी निवड चाचणीतील चांगली कामगिरी पाहता या उपक्रमासाठी 30 हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची आरक्षणाशिवाय केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community