देशाची मान उंचावत एका भारतीय जवानाने लेह ते मनालीपर्यंत 472 किमी अंतर कापून फास्टेस्ट सोलो (पुरुष चा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या रेकॉर्ड सोबतच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील या जवानाच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. भारताच्या व भारतीय संरक्षण खात्याच्या दृष्टीने ही सर्वात अभिमानास्पद कामगिरी आहे.
स्ट्रॅटेजिक स्ट्रायकर्स डिव्हिजनचे लेफ्टनंट कर्नल श्रीपाद श्रीराम यांनी 26 सप्टेंबर रोजी ही कामगिरी केली. त्यांनी शनिवारी पहाटे 4 वाजता लडाखमधील लेह येथून सायकलिंग सुरू केले आणि ते रविवारी दुपारी मनालीला पोहोचले.
इतक्या वेळात रचला इतिहास
लेफ्टनंट कर्नल श्रीराम यांनी 26 सप्टेंबर रोजी लेह ते मनाली (हिमाचल प्रदेश) पर्यंत ‘फास्टेस्ट सोलो सायकलिंग – (पुरुष)’ चा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर केला आहे. या प्रवासाचे एकूण अंतर 472 किलोमीटर होते आणि एकूण उंची सुमारे 8 हजार मीटर इतकी होती. श्रीराम यांनी प्रतिकूल हवामानाचा सामना करत पाच प्रमुख ठिकाणं पार करुन 34 तास 54 मिनिटांत हा खडतर मार्ग यशस्वीपणे पूर्ण केला.
A proud moment for all of us… Indian Army Officer Lt. Col. Sripada Sriram covered Leh to Manali, 472kms in 34hrs 54mins … Fastest Solo Cycling Men.. enters @GWR #GuinnessWorldRecord
💥💐🇮🇳👏🏻💫🎊 pic.twitter.com/XM2hjVYMIj— Girish Johar (@girishjohar) September 28, 2021
हे होते कारण
195 वा गनर्स दिवस आणि स्वर्णीम विजय वर्षाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला होता. असं संरक्षण प्रवक्त्याने म्हटले आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त
‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरं करण्यात आलं. त्यासाठी