लष्कराचे जगातील ‘हा’ सर्वात उंच बेसकॅम्प पर्यटकांसाठी खुला

आता पर्यटकांना या उंच ग्लेशियरवर जाता येणार आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोमवारी 27 सप्टेंबरला देशांतर्गत पर्यटकांसाठी जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन ग्लेशियरचे बेस कॅम्प खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना या उंच ग्लेशियरवर जाता येणार आहे. भारतीय जवानांनी इतक्या उंचावर देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आणि त्यांच्या देशभक्तीची जगाला ओळख करुन देण्यासाठी हे ग्लेशियर पर्यटकांसाठी खुले केले आहे.

लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी देशांतर्गत पर्यटकांसाठी सियाचीन बेस कॅम्पचे उद्घाटन केल्याचे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

(हेही वाचाः भारतीय जवानाची अशीही कामगिरी! गिनीज बुकमध्ये नोंद)

कठोर परिश्रमांचे कौतुक

“टूरिझम फॅार इनक्लुसिव ग्रोथ” ही या वेळच्या जागतिक पर्यटन दिनाची थीम आहे. लडाखमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लष्करातील जवान आणि अभियंत्यांनी प्रतिकूल हवामानात केलेल्या कठोर परिश्रमांचा गौरव करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सियाचीनमध्ये पर्यटन खुले करण्याच्या निर्णयामुळे सियाचीन नदीच्या काठावरील 30 हून अधिक गावांना याचा फायदा होणार आहे.

(हेही वाचाः चिनी अर्थव्यवस्थेच्या फुग्यातील हवा निघाली… ‘या’ कंपनीचे निघाले दिवाळे)

हुतात्म्यांना श्रद्धांजली

खासदार नामग्याल यांनी सियाचीन बेस कॅम्प येथील युद्ध स्मारकाला भेट दिली आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
लडाखचे पर्यटन सचिव मेहबूब अली खान यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ “आझादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचा भाग म्हणून पर्यटन स्वागत केंद्रातून स्वच्छता मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.

पाकिस्तानने केला होता विरोध

2019 मध्ये जेव्हा भारताने सियाचीन ग्लेशियरचे बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुले होईल असे जाहीर केले, तेव्हा पाकिस्तानने त्यावर आक्षेप घेतला होता. भारताने सियाचीनचा प्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले आहेत. सियाचीन ग्लेशियर हा एक वादग्रस्त प्रदेश आहे जो पर्यटनासाठी खुला होऊ शकत नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे.

(हेही वाचाः जमिनी, मालमत्ता विकून निधी उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here