जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद ते पर्यटन असा बदल झाला आहे. आता जगभरातील पर्यटकांना भारतातील सीमावर्ती भागातील ४८ ठिकाणी पर्यटनासाठी जाता येणार आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सियाचिन, गलवान, कारगिल युद्धभुमी पर्यटकांना खुली करण्यात येणार असून युद्धभुमीवरील जवानांचे आयुष्य पर्यटकांना पाहता येईल, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) ते बोलत होते. (Upendra Dwivedi)
( हेही वाचा : मंत्रीपद, विधान परिषदेची एक जागा रिप(ब्लिकन पक्षाला देण्याची Ramdas Athawale यांची मागणी)
‘भारताच्या विकासामध्ये भारतीय लष्कराची भूमिका आणि योगदान’ या विषयावर लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानादरम्यान आपले मत मांडले. यावेळी द्विवेदी यांनी देशाच्या विविध भागांत आणि विविध क्षेत्रांत लष्कर देत असलेल्या योगदानाबाबतची मांडणी लष्करप्रमुखांनी व्याख्यानात केली. (Upendra Dwivedi)
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) म्हणाले की, सीमा संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, मानवी सहकार्य आणि संकट व्यवस्थापन ही लष्कराची भूमिका आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लष्कर प्रथम प्रतिसाद देते. कोरोना काळातही लष्कराने रुग्णालयापासून विविध स्तरावर योगदान दिले. दरम्यान आता सीमावर्ती भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच सीमा स्मार्ट करण्यावर लष्कर भर देणार आहे. त्यात सीमावर्ती भागात फोर-जी सेवा सुरु करण्यात येत आहे. देशातील ३५० हून जास्त लष्करी चौक्यांवर फोर- जी सेवा सुरु झाली आहे. त्याचबरोबर ६०० गावांमध्ये सांस्कृतिक पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. (Upendra Dwivedi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community