Agnipath Scheme: अग्निपथ योजनेची तयारी 1989 पासून, सैन्य दलाची माहिती

सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून नागरिकांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता सैन्य दलाने एक पत्रकार परिषद घेत या योजनेची माहिती दिली आहे. या योजनेचा विचार गेल्या 33 वर्षांपासून सुरू असून, आता त्याची अंमलबजावणी होत असल्याचे Department of Miliatry Affairs(DMA) चे अतिरिक्त सेक्रेटरी अनिल पुरी यांनी सांगितले आहे.

सैन्याला तरुण वर्गाची गरज

देशात अग्निपथ योजना सुरू करण्यासाठी 1989 पासून विचार करण्यात येत आहे. यासाठी परदेशात असलेल्या सैन्य दलातील नियुक्त्या आणि तेथील एक्झिट प्लॅनचा संपू्र्ण अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना सैन्य दलाला अधिकस सक्षम करण्यासाठी हिताचे असल्याचे पुरी यांनी सांगितले. भारताच्या सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्य दलातील सैनिकांचे सरासरी वय हे 32 वर्ष आहे. हे वय कमी करुन 26 वर्षांपर्यंत आणण्याचा सैन्य दलाचा मानस आहे. देशातील सक्षम तरुण वर्गच जोखिम घेऊ शकतो. त्यामुळे ही योजना देशाच्या हिताची आहे, असेही अनिल पुरी यांनी सांगितले आहेत.

(हेही वाचाः Agnipath Scheme: अग्निपथ योजनेचा तरुण-तरुणींना होणार फायदा, कशी आहे योजना?)

अग्निवीरांसोबत कोणताही भेदभाव नाही

सध्या सैन्य दलात भरती झालेल्या जवानांना ज्या सुविधा मिळत आहेत त्या सर्व सुविधा अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती होणा-या अग्निवीरांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे सेवा शर्तींमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही. येत्या चार ते पाच वर्षांत 50 ते 60 हजार जवानांची सैन्यभरती होणार आहे. भविष्यात ही संख्या 90 हजार ते 1 लाख पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वप्रकारे देशाच्या आणि अग्निवीरांच्या हिताची असल्यामुळे ही योजना रद्द करण्याचा लष्कराचा कोणताही विचार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here