Indian Army: पहिले हर्मीस-९०० स्टारनायलनर ड्रोन लष्कराला मिळणार, काय आहे वैशिष्ट्य? जाणून घ्या

138
Indian Army: पहिले हर्मीस-९०० स्टारनायलनर ड्रोन लष्कराला मिळणार, काय आहे वैशिष्ट्य? जाणून घ्या

पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवण्याची लष्कराची क्षमता वाढणार आहे. भारतीय लष्कराला १८ जून रोजी पहिले हर्मीस-९०० स्टारलाइनर ड्रोन मिळणार आहे. हर्मीस-९०० या ड्रोनला ‘दृष्टी १० ड्रोन’ असे नाव देण्यात आले आहे. (Indian Army)

संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या २ ड्रोनपैकी पहिले १८ जून रोजी हैदराबादमध्ये सुपूर्द केले जाणार आहे. अदानी डिफेन्स सिस्टिम हर्मीस-९०० स्टारलाइनर ड्रोन लष्कर आणि नौदलासह भारतीय सैन्याला पुरवत आहे. संरक्षण मंत्रालयाने सैन्याला दिलेल्या आपत्कालीन अधिकारांतर्गत स्वाक्षरी केलेल्या कराराचा हा भाग आहे. लष्कर आपल्या भटिंडा तळावर हे ड्रोन तैनात करेल जेथून ते पाकिस्तानच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर लक्ष ठेऊ शकेल.

(हेही वाचा – Raj Thackeray : अजित पवार यांच्या बद्दल राज ठाकरे असे काही म्हणाले, की…)

भारतीय लष्कराने यापैकी दोन ड्रोन आणीबाणीच्या तरतुदींनुसार फर्मकडून मागवले आहेत. भारतीय लष्कराकडून याआधी हेरॉन मार्क १ आणि मार्क २ ड्रोन वापरत होत आहे. याशिवाय दृष्टी-१० किंवा हर्मीस-९०० ड्रोनचीही मागणी  देण्यात आली आहे.

काय आहे वैशिष्ट्य?
– अदानी डिफेन्सने संरक्षण विभाग आणि इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्ससोबत भागीदारी केली आहे. या तिघांनी मिळून हर्मीस ९०० आणि ४५०च्या एअर फ्रेम्स बनवल्या आहेत.

  • हर्मीस-९०० ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे ते ३० तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहण्यास सक्षम आहेत. या ड्रोनचा वापर विविध लष्करी कारवायांसाठी केला जातो.
  • टोही मोहीम तसेच हवाई बॉम्बहल्ल्याकरिता याचा वापर केला जातो.
  • ३० हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते आणि ४५० किलो पेलोड वाहून नेऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.