भारत-चीनचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये

109

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय लष्कराला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आले आहे. यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये सध्या तणाव आहे. दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. चीनकडून जड आणि हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून, भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून, इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.