गुजरातच्या वलसाडमध्ये महापुराच्या विळख्यात सापडलेल्या १६ नागरिकांना सोमवारी भारतीय तटरक्षक दलामुळे जीवनदान मिळाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत अंबिका नदीच्या काठी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
( हेही वाचा : १६१ कोटींची बनावट देयके सादर करून शासनाची फसवणूक)
महापुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला
गुजरातमध्ये आलेल्या महापुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात अंबिका नदीने रौद्र रुप धारण केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी दमण येथील कोस्ट गार्ड एअर स्टेशनशी संपर्क साधला असता तत्काळ बचाव पथक वलसाडच्या दिशेने रवाना झाले. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने उड्डाणात अडथळे आले, मात्र त्यावर मात करून हॅलिकॉप्टर मार्गस्थ झाले.
तटरक्ष दलामुळे जीवनदान
पुराचे पाणी वाढत असल्याने काही नागरिकांनी घराच्या छतावर, तर काहींनी उंच ठिकाणी आसरा घेतला होता. तटरक्ष दलाच्या जवानांनी परिस्थितीचा अंदाज घेत बचावकार्य राबवले आणि सर्व १६ जणांना सुखरूप बाहेर काढले.
Join Our WhatsApp Community