भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) ने 21 जुलै 2024 रोजी गुजरातमधील मंगरोल किनाऱ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या गॅबोन रिपब्लिकच्या मोटर टँकर झीलवरच्या गंभीर आजारी भारतीय नागरिकाला तातडीची मदत पुरवली. या रुग्णाची नाडी अत्यंत कमी गतीने सुरू होती आणि त्याच्या शरीराच्या अर्ध्या भागात सुन्नता होती, ज्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती.
(हेही वाचा – हाताने मैला साफ करणाऱ्या ८१ कामगारांचे मृत्यू; राज्य सरकारने Bombay High Court मध्ये मांडले विदारक सत्य)
(Indian Coast Guard) एअर एन्क्लेव्ह, पोरबंदरने तातडीने एक प्रगत तंत्रज्ञानानी युक्त आणि वजनाने हलके हेलिकॉप्टर पाठवले जे अतिशय वेगवान वारा, जोरदार पाऊस आणि प्रतिकूल हवामान असूनही मोटर टँकर झीलवर पोहोचले. हेलिकॉप्टरने मोटर टँकरवर अचूकपणे स्थितीचा अंदाज घेतला आणि रुग्णाच्या सुटकेसाठी एक बचाव बास्केट वापरले. या रुग्णाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी पोरबंदर येथे हलवण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी आयसीजीच्या सागरी सुरक्षिततेच्या अढळ वचनबद्धतेला आणि प्रतिकूल परिस्थितीतही तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सज्जतेला अधोरेखित करते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community