मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. ज्या ज्या वस्तू चीनमध्ये बनत आहेत, त्या आता सगळ्या भारतात बनू लागल्या आहेत, मग त्या लॅपटॉप, मोबाईल, फार्मा क्षेत्रातील वस्तू असो. तरीही फक्त १०-१५ टक्के स्वस्त मिळतात म्हणून भारतातील उद्योजक या वस्तू चीनकडूनच आयात करत आहेत. भारतातील उद्योजक आजही चीनच्या प्रेमात आहेत, अशी धक्कादायक माहिती सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन (Brigadier Hemant Mahajan) यांनी दिली.
(हेही वाचा MVA जागावाटप समितीत काँग्रेसकडून १० जणांची वर्णी; सुशीलकुमार शिंदे, विश्वजीत कदमांना डच्चू)
चीनचे तैवाननंतर भारत दुसरे लक्ष्य
सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने शनिवार, २७ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात कारगिल विजयाच्या २५व्या वर्षानिमित्ताने आयोजित ‘गाथा पराक्रमाची’ या विषयावरील व्याख्यानात ते (Brigadier Hemant Mahajan) बोलत होते. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते. भारतातील कॉर्पोरेट जगाचे हेच चिनी प्रेम भारतासाठी आत्मघातकी ठरणारे आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांना 2 वर्षांची मुदत देवून या दोन वर्षांत तुम्ही चीनकडून आयात थांबवून भारतातून त्या वस्तू खरेदी कराव्यात, अशी सक्ती केली तरच चीनकडून होणारी आयात थांबेल, असेही ब्रिगेडीयर महाजन म्हणाले. भारताने चीनवर कितीही डोळे वटारले तरीही चीनला त्याचा काहीही फरक पडत नाही. इतका चीन निर्ढावलेला झाला आहे. उलट चीन भारताशी एकाच वेळी अनेकविध मार्गाने युद्ध करत आहे. कधी सायबर वॉर, आर्थिक युद्ध, स्ट्रॅटेजिक युद्ध, आपल्याच देशात त्याचे समर्थक वाढवून भावनिक युद्ध अशा अनेक पातळीवर युद्ध खेळत आहे. त्यामुळे चीनला रोखणे तितके सोपे नाही. चीनचे तैवाननंतर भारत हेच लक्ष्य असणार आहे. कारण त्याला भारताला नमवून जगाला संदेश द्यायचा आहे कि, बघा भारताला आम्ही काबूत केले आहे, तर तुमचा काही परिणाम होणार नाही, असे ब्रिगेडीयर महाजन (Brigadier Hemant Mahajan) म्हणाले.
Join Our WhatsApp Community