खलिस्तानी समर्थकांच्या हत्येमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा हात असल्याचे कॅनडातील (Canada) जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) सरकारने म्हटले होते. त्यानंतर आता भारतानेही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. शनिवारी (२ नोव्हें.) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कॅनडातील अधिकाऱ्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. त्यांनी कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे.(Amit Shah)
(हेही वाचा-UPI द्वारे विक्रमी व्यवहार झाले; जाणून घ्या किती कोटींची झाली उलाढाल?)
रणधीर जैस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले, “हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. आम्ही याचा निषेध करतो. याबाबत आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स पाठवला आहे. तसेच कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे. हे आरोप म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्नांचा एक भाग असून अशा आरोपांमुळे दोन्ही देशातील संबंधामध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.” असेही ते म्हणाले. (Amit Shah)
(हेही वाचा-National Youth Award साठी अर्ज पाठवण्याचे आवाहन; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)
कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या फोन टॅप होत असल्याचा आरोपही जैस्वाल यांनी यावेळी केला. कॅनडा सरकारकडून भारतीय अधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत आहेत. याबाबतही आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच याचा निषेधनही नोंदवला आहे. हे आंतराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे, असं त्यांनी सांगितलं.(Amit Shah)
नेमकं प्रकरण काय?
कॅनडाचे उपराष्ट्रपती डेव्हिड मॉरिसन आणि गुप्तवार्ता सल्लागार नेथाली ड्रौइन यांनी अमित शाह यांच्यावर कथित हिंसक कारवायांचा आरोप केला होता. कॅनडामधील ‘द ग्लोब अँड मेल’ने याबाबतील वृत्त प्रसिद्ध केले होतं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय समितीला सांगितलं की शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह आहेत. मॉरिसन संसदीय समितीसमोर म्हणाले, “एका पत्रकाराने मला विचारलं की त्या हिंसाचारामागे असणारी व्यक्ती म्हणजे अमित शाह आहेत का? त्यावर मी पुष्टी केली की हो तीच व्यक्ती त्या सर्व घटनांमागे आहे” विशेष म्हणजे यावेळीदेखील कॅनडाने भारतावर नुसते आरोप केले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही.(Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community