काय आहेत आयएनएस ‘करंज’ ची वैशिष्ट्ये?

आयएनएस करंज पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकयार्ड लिमिटेडकडून करण्यात आली आहे. पाणबुडीच्या आतील तंत्रज्ञान हे फ्रांसमधील कंपनीकडून घेण्यात आले आहे. ही डिझेल व इलेक्ट्रिकल इंजिनने चालणारी पाणबुडी आहे.   

हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देतानाच शेजारील पाकिस्तानचीही चिंता वाढवणारी ‘स्कॉर्पिन‘ श्रेणीतील तिसरी पाणबुडी आयएनएस ‘करंज’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. जुन्या आयएनएस करंज या पाणबुडीचे माजी कॅप्टन ऍडमिरल व्ही.एस. शेखावत यांच्या हस्ते ही पाणबुडी नौदलाला सुपूर्द करण्यात आली. संपूर्ण भारतीय बनावटीची मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली ही पाणबुडी आहे. करंज पाणबुडीमुळे कलवरी श्रेणीतील एकूण तीन पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात जमा झाल्या आहेत. करंज पाणबुडीमुळे नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे. भारतातील पाणबुडींची संख्या एकूण १८ झाली आहे. यात १६ पाणबुडी डिझेल व इलेक्ट्रिक इंजिनच्या असून दोन पाणबुड्या न्यूक्लिअर इंजिनवर चालणाऱ्या आहेत.

(हेही वाचा : सीडीआर म्हणजे नेमकं काय?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here