Indian Navy Day 2024 : भारतीय नौदल दिनाचे काय आहे महत्त्व?

77
भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2024) दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नौदल दिन भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि राष्ट्रासाठी समर्पण यांचे प्रतीक आहे.
४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2024) साजरा करण्याचे कारण १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. या युद्धात पाकिस्तानने ३ डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ राबवले. या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे सैनिक मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा दिवस आपल्याला आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2024)  पहिल्यांदा १९७२ मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून भारतीय नौदल दिन दरवर्षी साजरा केला जातो.
भारतीय नौदल १६१२ मध्ये अस्तित्वात आले, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाचे नौदल तयार केले. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची (Indian Navy Day 2024)  स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर, १९५० मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदलही प्रचंड सशक्त होते. सावरकरांनीही नौदलाचे महत्त्व अधोरेखित केले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.