‘तौक्ते’तील नौदलाचे सर्वात मोठे बचावकार्य! नौदलाच्या अधिकाऱ्यांची कबुली!

खवळलेल्या समुद्राच्या जबड्यातून ६११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे नौदलाच्या जवानांनी आव्हान स्वीकारले असून बचाव कार्य सुरूच आहे.

तौक्ते वादळ निघून गेले, पण त्यातून अद्याप परिस्थिती सावरलेली नाही. कारण सोमवारी, १७ मे रोजी तौक्ते वादळाने जो मुंबईच्या अरबी समुद्रात कहर माजवला, त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे बॉम्बेहायचे झाले आहे. या ठिकाणी ओएनजीसीचे मोठे जहाज बुडाले. अशा वेळी त्यातील अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आव्हान नौदल आणि वायू दलाने यशस्वीपणे पेलले आहे. खवळलेल्या समुद्राच्या जबड्यातून ६११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे नौदलाच्या जवानांनी आव्हान स्वीकारले असून बचाव कार्य सुरूच आहे.

ओएनजीसीच्या जहाजावरील सर्वात मोठे बचाव कार्य

नौसेनेचे उपप्रमुख मुरलीधर सदाशिव पवार यांनी हे बचाव कार्य पाहून म्हणाले कि, मागील ४ दशकांमध्ये आपण कधीही इतके मोठे शोधकार्य आणि बचाव कार्य पाहिले नाही. नौसेनेच्या चार युद्धनौकांनी हे महान कार्य केले आहे. यातील सर्वात मोठे काम हे ओएनजीसीच्या पी ३०५ जहाजावरील बचाव कार्य होते. समुद्र किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर हा जहाज होते आणि दुर्दैवाने ते बुडाले. त्यामध्ये फासलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे हे आव्हान होते.

युद्धातील शक्तीशाली क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देता येऊ शकते. परंतु समुद्र कुणालाही सोडत नाही. तो जसा एक चांगला मित्र आहे, तसाच वाईट शत्रूही आहे. आमचे जवान अशा कठीण आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम आहे.
– नौसेना उपप्रमुख, मुरलीधर सदाशिव पवार.

(हेही वाचा : अखेर ओएनजीसीचे ‘ते’ जहाज बुडाले, ८३ जण बेपत्ता! )

प्राण वाचवणे प्राथमिकता! 

बचाव कार्यामध्ये जवानांना कोरोनाचा संसर्ग होईल, याची आम्हाला भीती नाही. आमच्यासाठी बचाव कार्य हे प्राधान्याचे आहे. आमचा जवानांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोस देण्यात आले आहेत, असे नौसेनेचे उपप्रमुख पावर म्हणाले.

बचाव कार्याचे ठिकाण                                   एकूण फसलेले                            वाचवलेले बार्ज

  • पी ३०५                                                        २७३                                       १७७
  • कार्गो बार्ज जीएलएल                                         १३७                                       १३७
  • बार्ज एसएस-३                                                १९६                                  बचाव कार्य सुरु
  • सागर भूषण ऑइल                                           १०१                                  बचाव कार्य सुरु

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here