भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका खासगी वाहिनीला नौदलाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मार्कोस होण्याची मिळणार संधी
मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो म्हणजे मार्कोस होण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. परंतु कोणालाही थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षींच्या अग्निवीर भरतीमध्ये नौदलात सामील होणा-या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोस प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल.
( हेही वाचा: संजय राऊतांना चमचा ही निशाणी द्या; शिंदे गटाच्या नेत्याची टोलेबाजी )
Join Our WhatsApp Community