भारतीय नौदलाचा मोझांबिक आणि टांझानिया यांच्याबरोबर पहिल्या त्रिपक्षीय सरावात सहभाग

भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची (आयएमटी ट्रायलॅट) पहिली आवृत्ती शनिवारी पार पडली. भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व मार्गदर्शित क्षेपणास्त्र लढावू गलबत, आयएनएस तर्कश, चेतक हेलिकॉप्टर आणि मार्कोस (विशेष दल) यांनी केले.

सरावाची व्यापक उद्दिष्टे 

प्रशिक्षण आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि सागरी सहकार्य बळकट करून सामान्य धोक्यांना तोंड देण्यासाठी क्षमता विकसित करणे हे या सरावाची व्यापक उद्दिष्टे आहेत.

(हेही वाचा – मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदें गटात जाणार? राजकारणात पुन्हा ट्विस्ट)

दरम्यान बंदर टप्प्याचा भाग म्हणून, भेट देणे,‘ बोर्ड होणे’, शोध घेणे आणि जप्तीचे कार्य करणे, यासारखी क्षमता निर्माण कार्ये; लहान शस्त्रांचे प्रशिक्षण, संयुक्त डायव्हिंग ऑपरेशन्स, नुकसान नियंत्रण आणि अग्निशमन व्यायाम, आणि ‘क्रॉस डेक’ भेटी नियोजित करण्यात आल्या आहेत. सागरी टप्प्यात बोट ऑपरेशन्स, फ्लीट मॅन्युव्हर्स, भेट, बोर्ड, शोध आणि जप्ती ऑपरेशन्स, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, लहान शस्त्रांनी गोळीबार, फॉर्मेशन अँकरिंग आणि ईईझेड गस्त यांचा समावेश आहे.

अशा प्रकारचे सराव सागरी सुरक्षा आणि हिंद महासागर क्षेत्रातील सागरी शेजारी देशांसोबत सहकार्य वाढविण्याच्या आणि सर्वांसाठी विकासाला चालना देण्याच्या भारताच्या आणि भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here