पाकिस्तानचे वांदे; भारतीय नौदलात ‘वेला’

फ्रेंच आराखड्याची पण भारतीय बनावटीची चौथी पाणबुडी ‘वेला’ हिचा ताबा मंगळवारी माझगाव डॅाकतर्फे भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आला. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेनुसार प्रोजेक्ट 75 मधून वेला पाणबुड्या बनवण्यात आल्या आहेत. आता वेला या पाणबुडीच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतर तिचा समावेश नौदल ताफ्यात करण्यात येणार आहे.

याआधीही बनवण्यात आल्या पाणबुड्या 

ताबा घेण्या- देण्याच्या कागदपत्रांवर माझगाव डॅाकचे व्यवस्थापकिय संचालक निवृत्त व्हाईस अॅडमिरल नारायण प्रसाद व नौदलाच्या पश्चिम विभागाचे चीफ स्टाफ आॅफिसर रिअर अॅडमिरल के.पी. अरविंदन यांनी स्वाक्ष-या केल्या. यापूर्वी माझगाव डॅाकमध्ये कलवरी, खांदेरी आणि करंज पाणबुड्या बनवण्यात आल्या आहेत. त्याच गटातील पाचवी पाणबुडी ‘वागीर’ हिचे जलतरण मागील वर्षी 12 नोव्हेंबर रोजी झाले. तिच्या बंदरातील चाचण्या सुरु आहेत. ती पहिल्या समुद्री चाचणीसाठी डिसेंबर महिन्यात बाहेर पडेल, अशी अपेक्षा आहे.

‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने पाऊल

पाणबुडीचे बांधकाम ही एक गुंतागुंतीची क्रिया आहे कारण जेव्हा सर्व उपकरणे सूक्ष्म करणे आवश्यक असते आणि त्याची   गुणवत्ताही उत्तम असणं  आवश्यक असतात तेव्हा अडचणी वाढतात. त्यामुळे भारतीय प्रांगणात या पाणबुड्यांचे बांधकाम हे ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here