‘सायलंट किलर शार्क’, ‘INS वागीर’ नौदलात दाखल; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

भारतीय नौदलात सोमवारी नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांच्या उपस्थितीत कलवरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आयएनस वागीर दाखल झाली. मुंबईतील माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड या स्वदेशी कंपनीने आयएनएस वागीर या पाणबुडीची निर्मिती केली आहे. ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 अंतरग्त आतापर्यंत कलावरी क्षेणीतील चार पानबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत.

वागीर ‘या’ पाणबुडीची वैशिष्टये

भारतीय नौदलात सामील झालेली आयएनएस वागीर ही एक आधुनिक डिझेल इलेक्ट्रिकल अटॅक सबमरीन आहे. आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे. ही ३५० मीटर खोलवर तैनात केली जाऊ शकते. यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्र बसवण्यात आली आहेत. ही पाणबुडी पूर्णपणे स्वदेशी असून, शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करु शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती शत्रूच्या रडारमध्ये येत नाही.

( हेही वाचा: एलाॅन मस्क यांचा नवा प्लॅन; आणणार ‘हे’ नवे सबस्क्रिप्शन माॅडेल )

सालंट किलर शार्क हे नाव का?

भारतीय नौदलाला 23 जानेवारीला INS वागीर अटॅक पाणबुडी मिळणार आहे. कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे. संरक्षण तज्ज्ञ याला सायलेंट किलर शार्क असे म्हणतात. ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही न येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करेल.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here