भारतीय नौदलाच्या (Indian Navy) जहाजातील एक नौसैनिक गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता आहे. सी मॅन II रँक साहिल वर्मा असे या नौसिकाचे नाव आहे. २७ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. १९ वर्षीय साहिल हा जम्मूचा रहिवासी आहे. २०२२ मध्ये तो भारतीय नौदलात रुजू झाला होता.
भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने शनिवारी (२ मार्च) या घटनेची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, साहिलच्या शोधासाठी जहाजे आणि विमानांसह मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. नौदलाने नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरीला (Naval Board of Inquiry) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – Prakash Ambedkar: वंचित आघाडीकडून लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रकाश आंबेडकर म्हणाले… )
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिल ज्या जहाजातून बेपत्ता झाला होता, ते जहाज २५ फेब्रुवारीला कोचीहून निघाले होते. साहिलला शेवटचे २५ फेब्रुवारी रोजी जहाजावर पाहिले गेले होते. त्याच्या बेपत्ता झाल्याची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. साहिलच्या कुटुंबीयांना २९ फेब्रुवारीला तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. साहिलचे वडील सुभाष चंद्र म्हणाले की, आम्हाला २९ फेब्रुवारीला जहाजाच्या कप्तानचा फोन आला होता. २७ फेब्रुवारीपासून साहिलचा शोध लागलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community