अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy) युद्धनौकेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणारा पाकिस्तानी जहाजावरील कर्मचारी जखमी झाला, त्या कर्मचाऱ्याला भारतीय नौदलाने तात्काळ वैद्यकीय मदत दिली आणि त्याचे प्राण वाचवले. (Indian Navy)
हेही वाचा-Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ने केले विरोधकांना संभ्रमित!
नौदलाने रविवारी (6 एप्रिल 2025) रोजी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या INS त्रिकंदला शुक्रवारी इराणी बोट अल ओमिदीकडून एक इमरजन्सी संदेश प्राप्त झाला. यानंतर नौदलाने ओमान किनारपट्टीच्या पूर्वेला सुमारे 350 सागरी मैल अंतरावर जखमी झालेल्या पाकिस्तानी क्रू मेंबरची मदत केली. (Indian Navy)
हेही वाचा- World Health Day : रुग्णांना लुबाडणाऱ्यांच्या ‘सर्जरी’ची गरज!
नौदलाने एका प्रकाशनात म्हटले आहे की, इंजिनवर काम करताना पाकिस्तानी बोटीचा क्रू मेंबर जखमी झाला होता. त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ इराणला जाणाऱ्या एफव्ही अब्दुल रहमान हंजिया या दुसऱ्या बोटीवर हलवण्यात आले. (Indian Navy)
यानंतर मेसेज मिळताच त्रिकंदने जखमी क्रू मेंबरला वैद्यकीय मदत देण्यासाठी लगेच मार्ग बदलला. एफव्ही अब्दुल रहमान हांजियाच्या क्रूमध्ये 11 पाकिस्तानींचा समावेश होता. त्यात बलुचिस्तानमधील नऊ आणि सिंध प्रांतातील दोन. याशिवाय इराणचे पाच जवानही उपस्थित होते. (Indian Navy)
हेही वाचा- Mumbai Airport वर २४ कॅरेट सोन्याच्या १६ सळ्या सीमाशुल्क विभागाकडून जप्त
यातील बलुचिस्तानचा एक सदस्य जखमी झाला होता. त्याचे हाड मोडून हाताला गंभीर दुखापत झाली होती, परिणामी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. आयएनएस त्रिकंदचे वैद्यकीय अधिकारी, मार्कोस (मरीन कमांडो) आणि जहाजाच्या ‘बोर्डिंग टीम’च्या पथकाने जखमीला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली आणि त्याचा जीव वाचवला. (Indian Navy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community