भारतीय नौदल (Indian Navy) जहाज किल्टनने दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या परिचालन तैनातीचा एक भाग म्हणून ब्रुनेई येथील मुआराला भेट दिली. या भेटीने दोन्ही राष्ट्रांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याविषयी भारताची प्रतिबद्धता दर्शविली. (Navy ship Kilton)
(हेही वाचा – Pune Porsche case मधील डॉ. पल्लवी सापळे यांची आहे ‘ही’ वादग्रस्त पार्श्वभूमी)
व्यावसायिक संवाद आणि सांस्कृतिक आदानप्रदान
बंदराला दिलेल्या भेटीत व्यावसायिक संवाद, परस्परांच्या जहाजांवरील भेटी आणि सांस्कृतिक आदानप्रदान यांचा समावेश होता. हे जहाज अभ्यागतांसाठी देखील खुले होते ज्यात अनिवासी भारतीय सदस्य आणि रॉयल ब्रुनेई येथील नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी जहाजाला भेट दिली. यावेळी त्यांना जहाजाची माहिती, भारताची स्वदेशी जहाजबांधणी क्षमता आणि समृद्ध सागरी वारसा याबद्दल माहिती देण्यात आली.
एस्प्रिट डी कॉर्प्सला चालना देण्यासाठी, भारतीय नौदल आणि रॉयल ब्रुनेई नौदलातील कर्मचारी यांच्यात व्हॉलीबॉलचा सामना खेळला गेला. जहाजाने आयएन–आयबीएन सागरी भागीदारी सरावामध्ये देखील भाग घेतला.यामुळे एकमेकांची रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धतीची समज वाढेल आणि परिणामी आंतरकार्यक्षमता आणखी मजबूत होईल.
या बंदरभेटीची यशस्वी पूर्तता हे भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ आणि सागर धोरणांच्या अनुषंगाने या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठीच्या कटिबद्धतेचे एक प्रात्यक्षिक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community