Indian Navy: अरबी समुद्रामध्ये नौदलाच्या ३ युद्धनौका तैनात, न्यायवैद्यक पथकाकडून तपासणी आवश्यक असल्याची सूत्रांची माहिती

विविध तपास संस्थांच्या माध्यमातून या घटनेची चौकशी केली जात आहे.

212
Indian Navy: अरबी समुद्रामध्ये नौदलाच्या ३ युद्धनौका तैनात, न्यायवैद्यक पथकाकडून तपासणी आवश्यक असल्याची सूत्रांची माहिती
Indian Navy: अरबी समुद्रामध्ये नौदलाच्या ३ युद्धनौका तैनात, न्यायवैद्यक पथकाकडून तपासणी आवश्यक असल्याची सूत्रांची माहिती

भारताच्या सागरी हद्दीमध्ये व्यापारी जहाजांवर ड्रोन हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर नौदलाने (Indian Navy) अरबी समुद्रामध्ये तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. हल्ला झालेले ‘एम. व्ही. केम प्लुटो’ हे जहाज मंगळवारी, २६ डिसेंबरला मुंबईच्या किनाऱ्यावर आल्यानंतर भारतीय नौदलाच्या स्फोटके निकामी करणाऱ्या पथकाकडून त्याची कसून तपासणी करण्यात आली.

हे जहाज मंगळूरच्या दिशेने जात असताना त्याच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. नौदलाने पी-८आय हे दीर्घपल्ल्याची टेहेळणी करण्याची क्षमता असणारे विमान तैनात केले असून सोबतीला ‘आयएनएस मोर्मुगाओ’, ‘आयएनएस कोची’ आणि ‘आयएनएस कोलकाता’ या युद्धनौकादेखील सागरात उतरविल्या आहेत.

(हेही पहा – Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, पुलवामामध्ये 3 संशयितांना अटक, शस्त्रास्त्रांचा साठा जप्त)

विविध तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशी…

भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर असताना ‘केम प्लुटो’ या जहाजावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला झाल्याचे मंगळवारी नौदलाकडून सांगण्यात आले. या जहाजावर हल्ला करण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारची स्फोटके वापरण्यात आली होती? हे स्पष्ट करण्यासाठी न्यायवैद्यक पथकाच्या माध्यमातून काही चाचण्या होणे आवश्यक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विविध तपास संस्थांच्या माध्यमातूनदेखील या घटनेची चौकशी केली जात आहे. अरबी समुद्रामध्ये व्यापारी जहाजांवर आणखी हल्ला होण्याची भीती वर्तवली जात असून या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.