Indian Navy : “गोल्डन विंग्स” पुरस्काराने सन्मानित पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण? जाणून घ्या

222
Indian Navy : "गोल्डन विंग्स'' पुरस्काराने सन्मानित पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण? जाणून घ्या

भारतीय नौदलाच्या पहिली महिला हेलिकॉप्टर वैमानिक अनामिका बी. राजीव यांना ‘गोल्डन विंग्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनून त्यांनी इतिहास रचला आहे. अनामिका यांनी शुक्रवारी, (७ जून) नौदलाचे हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली. (Anamika b. Rajeev)

तामिळनाडूतील अराक्कोणम येथील नेव्हल एअर स्टेशन येथे राजालीवर पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आली होती. या पासिंग आउट परेडमध्ये त्यांना प्रतिष्ठित ‘गोल्डन विंग्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, आणखी एका कामगिरीमध्ये, लडाखचे पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जामयांग त्सेवांग यांनीही हेलिकॉप्टर पायलट म्हणून यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली. केंद्रशासित प्रदेश लडाखमधील पहिले नौदल अधिकारी लेफ्टनंट जामयांग त्सेवांग यांनीही हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली. (Anamika b. Rajeev)

(हेही वाचा – NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन)

पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल राजेश पेंढारकर यांनी आयएनएस राजाली येथे आयोजित पासिंग आउट परेडमध्ये ‘गोल्डन विंग्ज’ पुरस्काराने २१ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

भारतीय नौदलाच्या सर्व हेलिकॉप्टर वैमानिकांसाठीचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रन ५६१ येथे कठोर उड्डाण आणि जमिनीवरील प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या २२ आठवड्यांचा सखोल प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

नौदलाने यापूर्वी डॉर्नियर-२२८ या सागरी पाळत ठेवणाऱ्या विमानासाठी महिला वैमानिकांना तैनात केले आहे. सब-लेफ्टनंट राजीव या सी किंग्ज, ए. एल. एच. ध्रुव, चेतक आणि एम. एच.-६० आर. सीहॉक्ससारख्या हेलिकॉप्टर्स उडवण्याची परवानगी मिळवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या होत्या.

(हेही वाचा –NDA Govt : महापौर ते केंद्रात मंत्रीपद! दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन )

२०१८ मध्ये, भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी लढाऊ विमान एकट्याने उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनून इतिहास रचला. त्यांनी त्यांच्या पहिल्या उड्डाणात मिग-२१ बायसन उडवले होते.

सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी लढाऊ विमानांचा प्रवाह खुला करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक वर्षापेक्षा कमी कालावधीत, ५ दशकांहून अधिक समृद्ध वारसा असलेल्या आय. एन. एस. राजाली येथील हेलिकॉप्टर प्रशिक्षण शाळेने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच मित्र देशांतील ८४९ वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. १०२व्या हेलिकॉप्टर रुपांतरण अभ्यासक्रमासाठी नव्याने पात्र ठरलेल्या वैमानिकांना भारतीय नौदलाच्या विविध फ्रंटलाइन ऑपरेशनल युनिट्समध्ये नियुक्त केले जाईल. जिथे ते हेरगिरी, पाळत ठेवणे, शोध आणि बचाव आणि पायरसीविरोध यासारख्या विविध मोहिमा पार पाडतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.