दुर्गम सीमा भागात शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आता भारतीय जवान पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून टेहाळणी करू शकणार आहेत. भारतीय सैन्याने ब्रिटीश कंपनीकडून जेटपॅक फ्लाईंग सूट मागवले असून नुकतीच त्याची उत्तरप्रदेशातील आग्रा येथे चाचणी घेण्यात आली.
( हेही वाचा : कोकणात लवकरच धावणार वंदे भारत!)
देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय सैन्य सातत्याने हायटेक योजना आखत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या जेटपॅक सूटची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आग्रा येथील इंडियन आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूल (एएटीएस) मध्ये नुकतेच या उपकरणाचे प्रात्यक्षिक पार पडले आहे. जेटपॅक सूट हे वैयक्तिक उड्डाण तंत्रज्ञान आहे. या सूटमध्ये तीन लहान जेट इंजिन असतात, जे परिधानकर्त्याला त्यांच्या हालचाली आणि उड्डाणाची दिशा नियंत्रित करण्यास मदत करतात.
या सूटच्या माध्यमातून भारतीय जवान एखाद्या सुपरहिरोप्रमाणे हवेत उडू शकतील. डेमो दरम्यान हा जेटपॅक फ्लाइंग सूट परिधान करून डेमो दरम्यान 51 किलोमीटर अंतर कापले. हा सूट धारण करून 12 हजार फूट उंचीवर जाता येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिचर्ड ब्राउनिंग यांनी ढोलपूर येथील आर्मी स्कूलमध्ये त्यांच्या जेट पॅक सूटचा डेमो दिला होता. सध्या भारतीय सैन्य पूर्व लडाख सीमेच्या वादानंतर चीनबरोबरच्या जवळजवळ 3500 किमी वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) संपूर्ण पाळत ठेवत आहे. त्यामुळे हे जेट पॅक सूट जवानांना मदत करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.