भारत आणि चीनचे सैन्य मागील ३ वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये एकमेकांच्या समोरासमोर आले आहे. (China) या संघर्षादरम्यान चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. चीनच्या कारवायांवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी भारत आता बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट (BIP) स्थापन करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. नियंत्रण रेषेजवळ चीनची लष्करी तयारी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. (China)
(हेही वाचा – ISIS Terrorists : दिल्लीत अटक करण्यात आलेले दहशतवादी बीटेक, इंजिनीअर; अनेक बॉम्बस्फोटांत सहभाग)
बीआयपीमध्ये सहभागी असलेले गुप्तचर अधिकारी भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या सहकार्याने हा विभाग कार्य करेल. (China) या बीआयपीला भारतीय गुप्तचर यंत्रणा (RAW), IB आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) कडून देखील सहाय्य प्रदान केले जाईल. सीमेवर हे इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यामागचा उद्देशही घुसखोरी आणि अतिक्रमणाच्या माध्यमातून स्थिती बदलण्याचे चीनचे प्रयत्न थांबवणे हा आहे.
चिनी सैन्यावर सतत लक्ष ठेवणार
या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टीम नियंत्रण रेषेच्या परिसरात चिनी आर्मी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) वर सतत नजर ठेवेल. त्याच्या शस्त्रास्त्रे आणि सैनिकांच्या संख्येत कोणतीही असामान्य कृती दिसून येताच, तो ताबडतोब सरकार आणि संबंधित यंत्रणांना कळवेल, जेणेकरून शत्रूवर वेळीच कारवाई करता येईल. (China)
टीममध्ये 4-5 गुप्तचर अधिकारी
बॉर्डर इंटेलिजेंस पोस्ट (बीआयपी) आयटीबीपीच्या सीमा चौक्यांजवळ (बीओपी) बांधण्यात येणार आहे. या प्रत्येक टीममध्ये 4-5 गुप्तचर अधिकारी तैनात असतील. सर्व अधिकारी देखरेख उपकरणे आणि विशेष प्रशिक्षणाने सुसज्ज असतील. त्यांचे एकमेव काम शत्रूच्या कारवाया तपासणे आणि त्यांच्या कमकुवतपणा शोधणे आणि संबंधित यंत्रणांना आणि सरकारला कळवणे हे आहे. या संघांच्या सुरक्षेची जबाबदारी आयटीबीपीकडे असेल.
सध्या किती बीआयपी स्थापन होत आहेत किंवा त्यासाठी किती बजेट मंजूर झाले आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. मात्र, या पथकांमध्ये पाळत ठेवण्याचे विशेष प्रशिक्षण असलेले अधिकारीच तैनात करण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली. ते चिनी लष्कराच्या प्रत्येक कारवाईवर बारीक नजर ठेवतील आणि त्याची माहिती भारतीय लष्कराला पाठवत राहतील. (China)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community