आत्मनिर्भरतेतून लष्कराचे स्वदेशीकरण शक्य; भारतीय वायूसेनेचे एअर मार्शल Vijay Kumar Garg यांचे प्रतिपादन

27
आत्मनिर्भरतेतून लष्कराचे स्वदेशीकरण शक्य; भारतीय वायूसेनेचे एअर मार्शल Vijay Kumar Garg यांचे प्रतिपादन

आधुनिक काळात संशोधन विकास आणि उद्यमशीलतेतून आत्मनिर्भरता आणि आत्मनिर्भरतेतून लष्करी स्वदेशीकरण शक्य असल्याचे प्रतिपादन भारतीय वायूसेनेचे एअर मार्शल विजय कुमार गर्ग (Vijay Kumar Garg) यांनी केले. (Vijay Kumar Garg)

(हेही वाचा – निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच लाभ, बाकींचा फायदा बंद; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ-2025 : खासदार औद्योगिक महोत्‍सवाच्या दुसर्‍या दिवशी संरक्षण क्षेत्रातील ‘इमर्जिंग अपॉर्च्युनिटी इन एअरोस्पेस, डिफेन्स अँड एव्हिएशन सेक्टर’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर एअर मार्शल विजय कुमार गर्ग (Vijay Kumar Garg) यांच्‍यासह आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, एअर मार्शल संजय गुराटिया, निवृत्त मेजर जनरल संजय वर्मा, तसेच लेफ्टनंट जनरल अनिल बाम उपस्थित होते. याप्रसंगी गर्ग म्हणाले की, भारतीय लष्कर आणि वायुसेना, बीआरडीओ, डिफेन्स रिसर्च विंग आदींच्या माध्यमातून संशोधन व विकास, तसेच सुट्या भागांची निर्मिती करून काम भागवत आहे. पण, संरक्षण क्षेत्रात अनेक उपकरणांच्या निर्मितीची गरज आहे. ही गरज केंद्राच्या योजना, निधीची उपलब्धता आणि उद्योजकांना प्रोत्साहन या बाबींचा उपयोग करून युवा पिढीने संशोधन व विकास करून स्टार्टअप प्रारंभ करावे. शासनाच्या भांडवलनिधीचा वापर करावा. त्यातून संकल्पनेचे व्यावसायिक रूप विकसित करता येईल, असे सांगितले. यासोबतच विदर्भात उद्यमशीलतेची कमी नाही. उद्योजकता सातत्याने वाढत आहे. या सर्वांचा उपयोग लष्कराच्या क्षमता वाढीसाठी निश्चित होऊ शकतो, असे स्पष्ट केले. (Vijay Kumar Garg)

(हेही वाचा – Hindu Temple : हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू; Minister Nitesh Rane यांचे आश्वासन)

यावेळी आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी, भारत 2027 मध्ये 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचेल आणि चीननंतर भारत ग्लोबल लिडरशीपच्या स्तरावर पोहोचेल. त्यासाठी स्टार्टअप हे जगातील मोठे क्षेत्र भारताकडे असेल, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर एअर मार्शल संजय गुराटीया यांनी, लष्कराची 75 टक्के खरेदी भारतीय उद्योजकांकडून व्हावी, असा शासनाचा आदेश आहे आणि लष्कराची, वायुसेनेची विमाने, त्यांची दुरुस्ती व देखभाल आदी क्षेत्रात स्टार्टअपला भरपूर वाव असल्याने मानसिकता बदलून युवा पिढीने पुढे यावे, असे आवाहन केले. निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय वर्मा यांनी, मी स्वतः निवृत्तनंतर डीआरडीओच्या संशोधन विकास शाखेत सल्लागार होतो. आता तंत्रज्ञान बदलले. आगामी काळात आव्हानांचा सामना करून युवा पिढीने धैर्याने पुढे यावे व शासकीय निधीचा वापर करून उद्दमशीलता जोपासावी, असे मत व्यक्त केले. चर्चासत्राच्या अंतिम चरणात मेजर जनरल अनिल बाम यांनी सांगितले की, लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा भारत हा जगातील तिसरा देश आहे. भारतात विविध क्षेत्रावर खर्च होतो; पण लष्कराच्या उपयोगासाठी खर्च व संशोधन विकास दोन्हींची गरज असल्याचे बाम म्हणाले. चर्चासत्रादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. चर्चासत्र समारोपप्रसंगी गटचर्चेत भारत डायनामिक लिमिटेडचे उपमहाप्रबंधक हर्षवर्धन दवे, यंत्र इंडियाचे सीएमडी गुरुदत्त रे, इंदमारचे सीएमडी योगेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. (Vijay Kumar Garg)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.