भारताच्या भूमीत गेल्या काही दिवसांपासून चीनकडून होणारी हेरगिरी ही सातत्याने वाढत आहे. याचबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारताने बंगालच्या उपसागरात प्रस्तावित असलेल्या अग्नी मिसाईलचे परीक्षण रोखले आहे. चीनच्या हेरगिरी करणा-या जहाजापासून होणारा धक्का लक्षात घेऊन भारताने हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बंगालच्या उपसागरात भारताकडून अग्नी मिसाईलचे परीक्षण करण्यात येणार होते. पण याचवेळी चीनने इंडोनेशियातून यूआन वांग-6 हे आपले हेरगिरी जहाज हिंदी महासागरात पाठवले आहे. त्यामुळे हिंदी महासागरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्स DETRESFAने याबाबतची माहिती दिली आहे.
चिनी जहाजाची हेरगिरी
यूआन वांग-6 हे चीनचे हेरगिरी जहाज तब्बल 22 हजार टन वजनाचे आहे. यावर हेरगिरी आवश्यक असणारी सर्व अत्याधुनिक यंत्रणा जसे की सेन्सर्स आणि अन्य उपकरणे कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारी हेरगिरी आणि उपग्रह प्रक्षेपणांवर पाळत ठेवण्यासाठी, लांब पल्ल्याच्या क्षंपणास्त्रांच्या कक्षीय मार्गाचा मागोवा घेण्यासाठी हे जहाज ओळखले जाते. शुक्रवारी सकाळी हे जहाज इंडोनेशियातील बाली बेटाजवळ होते. त्यानंतर हे जहाज हिंदी महासागरात दाखल झाले आहे.
(हेही वाचाः ‘…तर एकतर्फी कारवाई होईल’, राज्य महिला आयोगाची भिडेंना दुसरी नोटीस)
भारताने दिला होता इशारा
भारताने काही महिन्यांपूर्वीच देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील चिनी हेरगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. 10 आणि 11 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात नो-फ्लाय झोन घोषित भारत अग्नी मिसाईलची चाचणी घेणार होता, तरी देखील चीनने पुन्हा एकदा कुरापती करायला सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community