ब्रह्मोस-बराकसारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज ‘INS विशाखापट्टणम’ नौदलात सामील होणार

भारताची ताकद आणखी वाढणार.

126

चीनच्या वाढत्या सागरी सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलही आपली क्षमता वाढवणार आहे. INS विशाखापट्टणम ही युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही युद्धनौका १८ नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नौदलाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की, भारताला २८ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून पहिले स्वदेशी गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाज ‘P13B’ मिळाले आहे. नौदलात ती INS विशाखापट्टणम म्हणून ओळखली जाणार आहे. यासह, या महिन्याच्या अखेरीस आयएनएस वेला देखील नौदलात सहभागी होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्सने तयार केली आहे तर आयएनएस वेलाची रचना फ्रेंच नौदल गटाने केली असल्याचे सांगितले जात आहे.

भारताची ताकद आणखी वाढणार

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची देखरेख करण्यासाठी भारत २०२२ पर्यंत आपली ताकद वाढवणार आहे. INS विशाखापट्टणम व्यतिरिक्त, INS मुरमुगाव, इंफाळ आणि पोरबंदर देखील २०२२ पर्यंत समाविष्ट होणार आहेत. या सर्व युद्धनौका क्षेपणास्त्र हल्ले करण्यास देखील सक्षम असणार आहे.

(हेही वाचा – कोस्टल रोड: कांदळवन विभागाचे ५० कोटी रुपये गेले कुठे?)

शक्तिशाली INS विशाखापट्टणम

शक्तिशाली INS विशाखापट्टणम स्वदेशी गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर विमानविरोधी क्षेपणास्त्रे डागू शकते. या युद्धनौकेत सुपरसॉनिक अँटी शिप आणि लँड अॅटॅक १८ ब्रह्मोस मिसाईल बसवता येणार आहे. याशिवाय ते जमिनीवरून हवेत मारा करणारी ३२ बराक क्षेपणास्त्रे देखील लाँच करू शकते. तसेच हे अनेक प्रकारच्या सेन्सर्सवर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. याशिवाय या युद्धनौकेची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, कोणत्याही रडारसाठी ते शोधणे अशक्य आहे. याशिवाय ही युद्धनौका US MH 60 R सारखी दोन हेलिकॉप्टर वाहून नेण्यास सक्षम असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.