आयएनएस चिल्का येथे Agniveer तुकडीची पासिंग आऊट परेड

69
आयएनएस चिल्का येथे Agniveer तुकडीची पासिंग आऊट परेड

ओडिशातील आयएनएस चिल्का येथून 402 महिला अग्निवीर (Agniveer), 288 एसएसआर (मेड असिस्टंट) 227 नाविकांसह 2966 प्रशिक्षणार्थी 7 मार्च रोजी उत्तीर्ण झाले आणि या यशासह एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. सूर्यास्तानंतर आयोजित एका अनोख्या समारंभात, 16 आठवड्यांच्या नौदलातील सुरवातीच्या कठोर प्रशिक्षणाचा समारोप पासिंग आउट परेड (पीओपी) ने झाला. परेडचे निरीक्षण दक्षिण नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी केले. आयएनएस चिल्काचे कमांडिंग ऑफिसर कमांडर बी दीपक अनिल हे संचालन अधिकारी होते.

सुरेद्दी शिवा कुमार, माजी एसपीओ, संदीप गुप्ता, माजी पीओईएलपी, लोहरी बेसी, माजी पीओईएलपी, जीएस कोचर, माजी ईएमआर 1, तसेच प्रख्यात क्रीडा व्यक्तिमत्व एल्डोस पॉल, सीपीओ सीओएम (टीईएल) असे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. उत्तीर्ण होणाऱ्या सदस्यांचे कुटुंबिय सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले. पीओपी म्हणजे केवळ सुरुवातीच्या प्रशिक्षणाच्या यशस्वी पूर्ततेचेच प्रतीक नाही तर भारतीय नौदलात एका नवीन अध्यायाची सुरुवात देखील दर्शवते. या पुरुष आणि महिलांना लढाईसाठी सज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यासाठी सज्ज सैन्यात रूपांतरित करण्यासाठी भारतीय नौदल लिंगभाव विरहित अश्या तटस्थ वातावरणावर भर देते. (Agniveer)

(हेही वाचा – Madhya Pradesh मध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा; ‘या’ राज्याने घेतला कठोर निर्णय)

दक्षिण नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी आपल्या भाषणात, कठोर परिश्रम, शिस्त आणि वचनबद्धतेचे उदाहरण देणारा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. त्यांनी अग्निवीरांना त्यांचे कौशल्य वाढवावे आणि तांत्रिकदृष्ट्या जागरूक राहावे असे आवाहन केले, तसेच नौदलाच्या कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या मूलभूत मूल्यांना आत्मसात करावे असे आवाहनही केले. राष्ट्राचा सन्मान राखण्याचे आवाहन त्यांनी केले आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने आपला मार्ग निश्चित करावा, असे सांगितले. या पालकांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी अग्निवीरांच्या (Agniveer) पालकांचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी चिल्का चमूचे त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल आणि ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः’ या ब्रीदवाक्यानुसार जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल कौतुक केले.

प्रमुख पाहुण्यांनी गुणवंत अग्निवीरांना पदके आणि चषक प्रदान केले. देवराज सिंग राठोड, एव्हीआर (एमआर) आणि प्रमोद सिंग, एव्हीआर (एसएसआर) यांना अनुक्रमे नौदल प्रमुख रोलिंग ट्रॉफी आणि सर्वोत्कृष्ट अग्निवीर एमआर आणि एसएसआरसाठीचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. मानसा गुलिविंधला, एव्हीआर (एसएसआर) यांना गुणवत्तेच्या एकूण क्रमानुसार सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीरासाठीची (Agniveer) जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी देण्यात आली. मोहित कुमार, एनव्हीके (जीडी) यांना भारतीय तटरक्षक दलाचे रोलिंग ट्रॉफीचे महासंचालक आणि सर्वोत्तम एनव्हीके (जीडी) साठीचे महासंचालक सुवर्णपदक मिळाले. समारोप समारंभात, दक्षिण नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ वाईस एडमिरल व्ही. श्रीनिवास यांनी, आंग्रे विभागाला समग्र अजिंक्यपद करंडक आणि एकलव्य विभागाला उपविजेता करंडक प्रदान केली. त्यांनी ‘अंकुर’ या आयएनएस चिल्काच्या द्विभाषिक प्रशिक्षणार्थी मासिकाच्या 02/24 आवृत्तीचे अनावरण देखील केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.