INS चिल्कावर २८ मार्चला अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे पथसंचलन

107

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणोत्तर पथसंचलन म्हणजेच पासिंग आऊट परेड येत्या 28 मार्च रोजी आयएनएस चिल्का इथे होणार आहे. यात जवळपास 2 हजार 600 अग्निवीरांचा समावेश असून 273 महिला आहेत, त्यांनी चिल्का येथे सुरु असलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे पथसंचलन होणार आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार या पासिंग आऊट परेड समारंभाचे मुख्य अतिथी असतील आणि यावेळी होणाऱ्या पथसंचलनाचे ते अवलोकन करतील.

( हेही वाचा : 7th pay commission : केंद्रीय पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ)

पासिंग आऊट परेडची ठळक वैशिष्ट्ये :

  • पासिंग आऊट परेड हा प्रशिक्षणार्थींसाठी एक अविस्मरणीय प्रसंग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण असतो. प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर देशातील कोणत्याही प्रशिक्षण संस्थेतून अग्निवीर उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे सशस्त्र सैन्यदल आणि राष्ट्रासाठी नवीन सुरुवात करण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा आहे.
  • या पासिंग आऊट परेडदरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, पात्र अग्निवीरांना पुरस्कार प्रदान केले जातील.
  • देशाचे पहिले सीडीएस म्हणजे संरक्षण दल प्रमुख , दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी अग्निवीर योजनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, भारतीय नौदलाने यावर्षीपासून जनरल बिपिन रावत फिरता चषक पुरस्कार सुरु केला असून, ‘सर्वोत्कृष्ट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या महिला अग्निवीर प्रशिक्षणार्थीला दिवंगत जनरल रावत यांच्या मुलींकडून हा चषक प्रदान केला जाईल.
  • या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी, या पासिंग आऊट परेडला नौदलातील अनेक ज्येष्ठ नौदल कर्मचारी आणि महिला क्रीडापटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.