भारताची हिंदी महासागरातील ताकद वाढणार! भारतीय नौदलात स्वदेशी INS Mormugao दाखल

121

आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज INS Mormugao भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ते भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले असून भारताची हिंदी महासागरातील ताकद वाढणार आहे. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

(हेही वाचा – पोलीस भरतीसंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून मैदानी चाचणी, भरतीचे होणार‌ व्हिडिओ शुटिंग)

युद्धनौका ताब्यात घेतल्याने भारतीय नौदलाची ताकद चांगलीच वाढली आहे. मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये ते तैनात आहे. या विध्वंसक युद्धनौकेमुळे भारताचा हिंदी महासागरातील दरारा वाढणार असून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात मजबूत होणार आहे. गोव्यातील ऐतिहासिक बंदरावरून INS मुरगाव हे नाव देण्यात आले आहे. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, युद्धनौका आपली ताकद आहे. युद्धनौका तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे कौतुक असून आम्ही त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

INS विशाखापट्टणमनंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत माझगाव डॉकमध्ये विशाखापट्टणम श्रेणीतील ४ नैकांची निर्मिती करण्याची घोषणा २०११ मध्ये करण्यात आली होती. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली कोलकात्ता श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.