भारताच्या नौदलाच्या ताफ्यात आता सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम दाखल झाली आहे. यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. विशाखापट्टनमच्या समावेशामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.
आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत बनवली युद्धनौका
आयएनएस विशाखापट्टनम ही भारतातील सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक मानली जाते. आयएनएस विशाखापट्टनमची रचना नौदल रचना संचालनालयाने केली आहे. तर माझगाव डॉकयार्ड लिमिटेडने या युद्धनौकेची बांधणी केली आहे. हा नौदलाच्या P15B प्रकल्पाचा भाग आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत 75 टक्के स्वदेशी उपकरणांनी आयएनएस विशाखापट्टनम बनवण्यात आले आहे.
(हेही वाचा : आनंदाची बातमी! गायी पाळा, फुकट वीज मिळवा! )
आयएनएस विशाखापट्टनमची वैशिष्ट्ये
- आयएनएस विशाखापट्टनम हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी 32 बराक आणि 8 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
- हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करते.
- विमान, हेलिकॉप्टर, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- आयएनएस विशाखापट्टणम 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
- आयएनएस विशाखापट्टणमची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7400 टन आहे.
- या युद्धनौकेचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे.
- त्याला चार गॅस टर्बाइन इंजिनमधून शक्ती मिळते.