इराणने (Iran) इस्रायलवर (Israel) बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ला केला. त्यामुळे दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एक विशेष ॲडव्हायजरी जाहीर केली आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमधील (Israel) परिस्थितीवर दूतावास बारकाईने लक्ष ठेवून आहे.
देशांतर्गत अनावश्यक प्रवास टाळावा
या भागातील सद्यपरिस्थिती पाहता स्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये (Israel) राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिल आहे. देशांतर्गत अनावश्यक प्रवास टाळावा, शेल्टर हाऊसच्या जवळ रहावे, असेही सांगण्यात आले आहे. दूतावासातर्फे सध्या तेथील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, दूतावासाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा, असेही दूतावासातर्फे जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
📢*IMPORTANT ADVISORY FOR INDIAN NATIONALS IN ISRAEL*
Link : https://t.co/OEsz3oUtBJ pic.twitter.com/llt83IwIZ0
— India in Israel (@indemtel) October 1, 2024
दूतावासाची हेल्पलाईन +972-547520711 +972-543278392
ईमेल: [email protected]
ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही ते या लिंकद्वारे (https://forms.gle/ftp3DEXgJwH8XVRdA) नोंदणी करू शकतात, असेही भारतीय दूतावासानेनमूद केले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community