अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला (Iran) अमेरिकेसोबत अणू करार करा, अन्यथा युद्धाला सामोरे जा, असा इशारा दिला होता. मात्र इराणने अमेरिकेच्या या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली. उलट इराणवर हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत.
इराणी (Iran) सैन्याने देशभरात भूमिगत तळ बनवून तिथे ठेवलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी सज्ज केली आहेत. हे भूमिगत तळ देशावरील कोणत्याही मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार केले आहेत. दुसऱ्या बाजूला इराणच्या (Iran) सर्वोच्च नेत्यानेही बदला घेण्याची धमकी दिली आहे. मागील आठवड्यात इराणने अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यासाठी नकार दिला. ट्रम्प म्हणाले, इराण (Iran) सहमत झाला नाही तर मोठे बॉम्बस्फोट होतील. हा बॉम्बस्फोट असा असेल की त्यांनी (इराणने) आजवर पाहिला नसेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
(हेही वाचा Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक)
इराणचे (Iran) सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खोमेनेई यांनी ट्रम्प यांच्या धमकीला सोमवारी उत्तर दिले. आमेरिकेने बॉम्ब हल्ले केले तर त्यांना तितक्याच मोठ्या बॉम्ब वर्षावाला, प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. आमचे पूर्वीपासूनच अमेरिका व इस्रायलशी शत्रुत्व आहे. ते केवळ हल्ल्याची धमकी देतात. परंतु, अशा हल्ल्याची आम्हाला शक्यता वाटत नाही. तरीदेखील त्यांना असा काही प्रयत्न केला, खोडसाळपणा केलाच तर नक्कीच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल, असे इराणने (Iran) म्हटले.
Join Our WhatsApp Community